Social Icons

Featured Posts

Saturday, 8 November 2014

प्रेमाचा खरा अर्थ……

प्रेमाचा खरा अर्थ……
दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

                        संकलन-   अभिजीत पाटील

Thursday, 15 August 2013


माझ्या प्रिय मित्रांनो फक्त तुमच्यासाठी !!! जरूर वाचा आणि तुमचे मत व्यक्त करा
आज देशाचा ६७ स्वातंत्र्य दिन आहे , पण आज रोजी सुद्धा लोकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का, हि विचार करण्याची गरज आहे.
कारण भारत देश आज सुद्धा प्रत्येक क्षेत्रात परकियांच्या वर ९० टक्के अवलंबून आहे. उद्योग ,व्यापार , अन्नधान्य ,इंधन,शस्त्रात्रे ,शिक्षण आणि अशी कितीतरी क्षेत्रे.

यात सर्व काही सरकार चा दोष आहे, असे म्हणता येत नाही. दोष आहे तो म्हणजे आपल्या लोकांच्या विचारांचा . ६७ वर्षे उलटून गेली तरी सुद्धा लोकांचे विचार गुलाम गीरीचेच आहेत. १२५ करोड जनते पैकी 60 टक्के जनता आज सुद्धा परकीय कंपन्यांचीच गुलामगिरी करत आहे.
आजची तरुण पिढी चांगला पगार कमवणारा नोकर होण्याचे ध्येय डोळ्या समोर शिक्षण घेत आहे, याचा खूप खेद वाटतोय.
कारण आपल्या स्वातंत्र्यवीरांनी परकीय सत्ता , परकीय कपड्यांची होळी काशासाटी केली होती, महात्मा गांधी यांनी चरखा काशासाटी हातात घेतला होता, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेल्या असंख्य यातना, भगतसिंग, बाबू गेनू यांनी स्वताच्या प्राणांची आहुती दिली ,
माझ्या प्रिय मित्रानो याचा खरा अर्थ आपण विसरून गेलो आहोत.
या सर्वांचा एकाच उद्देश या पाटीमागे होता तो असा कि "स्वावलंबी व्हा" जेणे करून या पुढे भारतीय लोकांना परकियांच्या समोर हात पसरू नये.
म्हणजेच स्वता उदोजक व्हा, नवीन संकल्पना राबवून नवनवीन उद्योग उभारून कमीत कमी आपल्या भारत देशाला प्रत्येक क्षेत्रातून गुलामगिरीच्या पंज्यातून वाचवा.
आणि आज भारत देशातील उच्चशिक्षित पिढी ऐथे गुलामगिरीसाठी कमी पैसे मिळतात म्हणून बाहेर जाऊन परकीयांचे गुलाम बनतात, केवळ जास्त पैश्याच्या लोभासाठी.
आणि ज्यांना स्वातंत्र्याचा , स्वावलंबनाचा अर्थ समजला अशे फक्त ३० टक्के लोक आपल्या भारतात आहेत.
त्यापैकी प्रमुख्याने रतन टाटा, नारायण मूर्ती, धीरूभाई अंबानी या सारखे बरेच कोहिनूर हिरे आपल्या सोबत आहेत.

आणि हाच विचार भारत सरकारने काही वर्ष पूर्वी अमलात आणला आणि नव नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु केले
त्यामुळे २० % लोक स्वावलंबी झाले सुद्धा, पण बाकीचे पुन्हा परकीय कंपन्याच्या नोकरी साठी भिकेचे हात घेऊन उभे राहत आहेत .

आज देशाची बरीच अर्थव्यवस्था माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रावर अवलंबून आहे . आणि आज रोजी या क्षेत्रात काम करणारे ५० टक्के परकीय कंपन्यासाठी काम करत आहेत.आपल्या कल्पना काही रुपयांच्या मोबदल्यासाठी दुसऱ्या देशांच्या विकासासाठी वापरत आहेत .

आणखी एक खेदजनक बाब अशी काही संगणक तज्ञ नोकरी मिळेना म्हणून किवा नोकरी मधला तणाव पेलता येत नाही म्हणून स्वताचे जीवन संपवत आहेत .

आणि म्हणूनच आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संगणक प्रणाली क्षेत्रामध्ये संगणक तज्ञांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या खुणगाठ आम्ही काही तरुणांनी बांधली आहे .जे नुकतेच संगणक या क्षेत्र मध्ये पदवी घेऊन बाहेर पडले आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत त्यांच्या साठी हीच ती हक्काची जागा, येथे या आणि तुमच्या जीवनात यशस्वी व्हा .

आणि माझ्या प्रिय मित्रांना माझे हे एक अभिवादन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे.

संपर्कासाठी : गणेश जंगम
मोबाईल .8600811129

Saturday, 27 July 2013

स्वागत

नमस्कार मी  अभिजीत पाटील ,माझा ब्लॉग मध्ये आपला स्वागत आहे.,हा माझा ब्लॉग मध्ये तुम्हाला कथा ,कविता,विनोद ,मजेशीर गोष्टी ,नोकरीच्या घडामोडी ,त्या बरोबर अजून खूप काही पाहता येईल .जर तुमच्या
जवळ जर असा काही गोष्टी असतील तर मला ई मेल  करा ,माझा ई मेल apatil850@gmail.com . जर ते तुमचा स्वताचा लेखन असेल तर त्या खाली तुमचे नाव लिहा ,जर ते संकलन असेल तर संकलन  असा खाली लिहा ,
        मी  तुमचा मेल ची वाट  पाहतोय.

Race Game

Sample Text